देशातील कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1 हजार 778 नवीन रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे काल 1 हजार 581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि 33 जणांचा मृत्यू झाला होता देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक कोरोनामुक्त झाले आहेत त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 605 झाली आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 73 हजार 57 लोक संसर्गमुक्त झाले आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत