जागतिक टीबी किंवा क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो.
24 मार्च 1892 रोजी, जर्मन चिकित्सक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कोचने यांनी घोषित केले की त्यांना क्षयरोगाचे कारण सापडले आहे- टीबी बॅसिलस.
त्यांनी हा शोध बर्लिन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हायजीनमधील शास्त्रज्ञांच्या गटाशी शेअर केला.
1982 मध्ये, त्यांच्या शोधानंतर 100 वर्षांनी, इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्यूबरक्युलोसिस अँड लंग डिसीजने 24 मार्च रोजी जागतिक क्षय दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली.
तथापि, 1995 मध्ये WHO आणि युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीद्वारे दशकभरानंतर जागतिक क्षय दिवस साजरा करण्यात आला.
क्षयरोगाला टीबी असंही म्हटलं जातं. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक थीम तयार करण्यात येते.
या वर्षीची थीम 'Invest to End TB. Save Lives.' अशी आहे.
जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजीच साजरा करतात. याचं कारण डॉ. रॉबर्ट कोचने यांनी या दिवशी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियमच्या शोधाची घोषणा केली.
कोच यांच्या घोषणेवेळी हा रोग प्राणघातक होता. आणि युरोप आणि अमेरिकेतील सात पैकी एकाचा मृत्यू होत होता. त्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे.