समंथा रूथ प्रभूच्या आगामी 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. समंथाचे हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. समंथाचा 'शकुंतलम' सिनेमातील लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. समंथानेदेखील 'शकुंतलम'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. समंथा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 'शकुंतलम' व्यतिरिक्त समंथा 'रेंदू कादल' आणि 'यशोदा' सिनेमातदेखील दिसणार आहे. समंथाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. लवकरच समंथाचा 'शकुंतलम' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.