अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर राहायचे आहे. त्यासाठी अरिन आणि रायन यांनी खास युक्तीही काढली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीनेच याबाबत माहिती दिली आहे. प्रदीर्घ काळापासून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या माधुरीला कॅमेऱ्यांमध्ये रहायला आवडते. परंतु, याउलट तिच्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर राहायचे आहे. अरिन आणि रायनला माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या नजरेत येऊ नये असे वाटते. त्यामुळे हे दोघे अनेक युक्त्या शोधून काढत असतात. दोघेही कारमध्ये कसे लपून बसतात? आणि मीडियापासून स्वतःला कसे वाचवतात? याबाबत माधुरीने सांगितले आहे. पापाराझी आपला कॅमेरा घेऊन तयार असतात. परंतु, या पापाराझींना कसा चकमा द्यायचा हे माझ्या मुलाला चांगले माहीत आहे. दोघेही आधीच येऊन गाडीत येऊन बसतात. माधुरी सांगते, आम्ही बाहेर थिएटरमधून बाहेर पडायच्या आधीच ते गाडीत बसलेले असतात.