दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या समंथा तिच्या आगामी यशोदा या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यापासून सर्वजण समंथाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. समंथाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. समंथाचा फोटो पाहून तिचे चाहते आता काळजीत पडले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोमध्ये समंथाने हाताला सलाईन लावलेले दिसत आहे. फोटोसोबत समंथाने आपल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. आपण एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहोत असे समंथाने सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या आजाराचे निदान झाले, असे समंथाने सांगितले आहे.