अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी ईद पार्टीचे आयोजन केले होते.



ईद पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली. पार्टीला सलमान खान आणि शहनाज गिल देखील उपस्थित होते.



पार्टीमधील शहनाज आणि सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.



व्हिडीओमधील शहनाज आणि सलमानच्या बॉडिंगनं अनेकांचे लक्ष वेधले.



पार्टीमधून घरी जाणाऱ्या शहनाजला गाडीरपर्यंत ड्रॉप करण्यासाठी सलमान खान बाहेर आला.



अनेक फोटोग्राफर्स शहनाज आणि सलमानचे फोटो काढत होते.



दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मला या दोघांमघील बॉडिंग खूप आवडते.'



शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.



सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली' मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.



काही दिवसांपूर्वी शहनाजनं शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता.