मंगळवारी (3 मे) जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा सण उत्साहात साजरा केला. सलमान खानने बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी ईद पार्टी दिली. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी ही पार्टी होस्ट केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. कंगना रनोट, करण जोहर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आदी सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली.