बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता असणारा करण जोहर त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो.



'कॉफी विथ करण' या करणच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते.



या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतात.



आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, आणि सलमान खान यासारख्या दिग्गज कलाकारांनी शोमध्ये हजेरी लावली आहे.



आता या कार्यक्रमाबद्दल करणनं मोठा निर्णय घेतला आहे.



त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.



करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहा सीझननं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.



पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाही.



हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे करणने म्हटले.



हा शो मझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होता अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.