बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान त्याच्या अभिनयानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. सलमानचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सलमान हा 2016 मध्ये 100 कोटी मानधन घेणारा पहिला अभिनेता ठरला होता. रिपोर्टनुसार, टायगर जिंदा है या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी सलमाननं 130 कोटी मानधन घेतलं आहे. सलमान एका महिन्यात जवळपास 16 कोटी कमवतो. मुंबईमधील बांद्रा परिसरातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचा 1 बीएचके फ्लॅट आहे. तसेच त्याचे पनवेलमध्ये फार्म हाऊस देखील आहे. रिपोर्टनुसार सलमानकडे 2,255 रूपये एवढी एकूण संपत्ती आहे. तसेच गेली कित्येक वर्ष सलमान बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.