कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारदेखील विशेष पाऊले उचलत आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्ह्यांमध्येदेखील वेगवेगळे उपाय केले जात आहेत. अशातच सलमान खानला महाराष्ट्र सरकारने विशेष जबाबदारी दिली आहे. सलमान आता जनतेला लस घेण्याचा सल्ला देणार आहे. महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. योजने अंतर्गत सरकारने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता सलमान नागरिकांमध्ये लस घेण्याबबात जनजागृती करणार आहे. लसीकरणात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये हा वेग कमी आहे. मुळेच या भागात लस घेण्याबाबत जागरूकता व्हावी यासाठी अभिनेता सलमान खानची मदत घेतली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.