प्रत्येक वर्षी होणारा Google For India इव्हेंट आज सुरु झाला आहे.
या इव्हेंटमध्ये गूगल इंडियाकडून भारतासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
गूगल लवकरच असं एक फीचर आणणार आहे ज्यात आपण सर्च केलेली माहिती आपल्या मोठ्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.
5 भाषांमध्ये ऐकू शकणार सर्च रिझल्ट
गूगलचं हे ग्लोबल फर्स्ट फीचर त्या लोकांना लक्षात घेऊन बनवलं आहे जे लोकं ऐकूण गोष्टी समजू इच्छितात.
या फीचरअंतर्गत आपण गूगल असिस्टंटला सर्च रिझल्ट वाचून दाखवण्याची विनंती करु शकणार आहात.
गूगलचं हे फीचर त्या लोकांसाठी फार महत्वाचं ठरणार आहे जे अंध आहेत.
जे लोकं पाहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत त्यांना माहिती ऐकण्याची व्यवस्था या अॅपमुळं होणार आहे.
या इव्हेंटमध्ये कंपनीनं Youtube Shorts हे अॅप देखील लॉन्च केलं आहे. आतापर्यंत हे एक फीचर यू-ट्यूब वर दिसायचं. मात्र आता याला वेगळ्या पद्धतीनं यूजर वापरु शकणार आहेत.