पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला काही वेळा पूर्वी भीषण आग लागली आहे. यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. शोरूम मधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत. तर या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईतील पवई इथल्या साकी विहार रोडवर भीषण आग लागली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनी समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. आगीमुळे धुरांचे लोळ सभोवतालच्या परिसरात पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.