मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. यूट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक उंची गाठलेली आहे. मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. मिथिलाची नेटफ्लिक्सवरील वेब सिरीज 'लिटील थिंग्स' भरपूर गाजली. सध्या मिथिलाचा एक नवा लूक चर्चेत आलाय नुकतेच तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत या फोटोमध्ये मिथिला बेबी पिंक ड्रेस मध्ये दिसतीये नेहमीच्या हेअरस्टाईल पेक्षा थोड्या हटके लूक मध्ये मिथिला खूपच क्युट दिसतीये मिथिलाच्या या फोटोंना चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे.