बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर-खान यांचा मुलगा जेह अली खान नुकताच एक वर्षांचा झाला आहे. नवाब कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील सर्वात तरुण नवाब म्हणजेच जेह अली खान याचा वाढदिवस एकत्र साजरा केला. या फोटोत तैमूर गायब आहे आणि सारा तिच्या भावांसोबत आणि वडिलांसोबत क्युट पोज देत आहे. फोटोमध्ये सारा जेहसोबत खेळताना दिसत आहे. बाकीच्या फोटोंमध्येही सारा, इब्राहिम आणि सैफ हे जेहवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. करीना आणि सैफने 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा अर्थात ‘जेह’चा जन्म झाला.