‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रचंड चर्चेत असते.

रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

आता आर्ची फेम अभिनेत्री प्रेमात पडली आहे. हो.. रिंकूने स्वतः पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे.

रिंकू ज्याच्या प्रेमात पडलीये तो कुणी मुलगा नसून, एक श्वान आहे.

नुकताच रिंकूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबतच तिने खास कॅप्शन देखील लिहिले आहे.

रिंकूनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये ती तिच्या पाळीव श्वानाला प्रेमानं मिठी मारून त्याच्याशी खेळताना दिसत आहे.

तिच्या या व्हिडीओला तिने खास कॅप्शन देखील दिले आहे.

'प्राण्यांवर प्रेम करा, ते कधीच तुम्हचं हृदय तोडणार नाहीत..',

असं क्युट कॅप्शन तिने लिहिलं आहे. चाहत्यांनी देखील तिच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट केल्या आहेत.