अभिनेत्री साई पल्लवी तिच्या चित्रपटांमधील अभिनयासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. साई पल्लवीने प्रत्येक चित्रपटात तिच्या अतुलनीय अभिनयाने लोकांना प्रभावित केले आहे. राणा डग्गुबतीसोबतचा तिचा 'विराट पर्वम'ही प्रेषकांना चांगलाच आवडला होता. आज साईचा 'गार्गी' सिनेमागृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती गार्गीची मुलगी आहे. गार्गी तिचे वडील ब्रम्हानंदम (आरएस शिवाजी) यांना वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करते. गार्गीचे वडील एका बलात्कार प्रकरणात आरोपी बनले आहेत. या घटनेने गार्गी पूर्णपणे हादरली आहे. पण ती हार मानत नाही. केस लढण्यासाठी ती वकील इंद्रंस कालियापेरुमल (काली वेंकट) यांची मदत घेते. साई पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे चाहते कौतुक करत आहेत.