बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले.
आता सुष्मितानं ललित यांच्या या पोस्टवर रिअॅक्शन दिली आहे.
मी सध्या आनंदी आहे. मी लग्न केलेलं नाही. साखरपुडा देखील केला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. हे माझं स्पष्टीकरण, आता तुम्ही स्वत:चं आयुष्य जगा आणि काम करा.' असं कॅप्शन सुष्मितानं तिच्या पोस्टला दिलं आहे.
सुष्मितानं पुढे कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी शेअर केला नाही त्यांच्यासाठी 'None of Your Business, असं कॅप्शन सुष्मितानं या पोस्टला दिली आहे.
सुष्तिताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.
ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाफ असा केला.
ललित मोदी यांनी पोस्ट केलेले फोटो पाहून दोघांचा साखरपुडा झाला आहे, असं म्हटले जात होतं. फोटोमध्ये सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे.
सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते.