26 जानेवारी 2022 रोजी आपला 75 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे



देशात दरवर्षी या दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे (Republic Day Parade) आयोजन केले जाते.



परंतु, यावेळी परेड ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे.



गेल्या 75 वर्षात उशिराने परेड सुरु होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचं कारण असं की,



कोरोनाचे नियम आणि श्रद्धांजली सभेमुळे प्रजासत्ताक दिनाची परेड यावर्षी उशिराने सुरु होणार आहे.



सर्वात आधी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल.



यानंतरच परेडला सुरुवात होणार आहे.



यावेळी ही परेड 10:30 वाजता सुरू होणार आहे. साधारण 8 किलोमीटर अंतराची ही परेड असणार आहे.