मराठी बिग बॉस या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

नवरात्रोत्सवानिमित्त सईने खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हिरवा घागरा, दागिने आणि हातात दांडिया अशा लूकमधील फोटो सईने शेअर केले आहेत.

सईच्या या लूकला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

अनेकांनी सईच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

फोटोला सईने कॅप्शन दिले आहे, 'सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा'

सईच्या सोशल मीडियावरील पोस्टला तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते.

सईने 'मिशन चॅम्पियन' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

बिग बॉसमधील हटके अंदाजामुळे सई लोकूर चर्चेत आली होती.

बिग बॉसमधील पुष्कर जोग आणि मेघा धाडे यांच्यासोबतच्या सईच्या मैत्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.