युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील या मराठी बिग बॉसच्या घरात जाणार या बातमीनेच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या..

अत्यंत लहान वयात महिला कीर्तनकार म्हणून त्यांना राज्यभरात मोठी प्रसिद्धी मिळाली..

त्यांचे असंख्य चाहते आणि त्यांच्या कीर्तनासाठी गर्दी करणारा मोठा श्रोता वर्ग आहे.

बिगबॉसच्या घरात गेल्याबद्धल शिवलीला पाटील यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं..

बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या सोबत वाद चर्चेचा ठरला

मराठी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय चुकला असला तरी हेतू प्रामाणिक असल्याचा दावा

बिगबॉसमध्ये जाण्यामुळेच तिथे पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा गजर झाल्याचा युक्तिवाद

भविष्यात ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असे निर्णय घेणार नाही, शिवलिला पाटील यांचं स्पष्टीकरण

बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीलाताईंचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर बुलढाण्यात गुन्हा

आयोजकांनी कीर्तन कार्यक्रम आयोजित केल्यामुळे गर्दी जमली आणि कोविड प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा गुन्हा