सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक मोठे विक्रम केले आहेत. तेंडुलकर हे केवळ खेळपट्टीवरच नाही तर व्यवसायातही मोठे नाव आहे. त्याने त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा त्याच्या घरावर खर्च केला. वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवर सचिन तेंडुलकरचे घर आहे. सचिन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह या बंगल्यात राहतो. हे घर 2007 मध्ये मास्टर ब्लास्टरने 39 कोटी रुपयांना विकत घेतले होते. सचिन तेंडुलकरचे हे घर 6000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. खरे तर हे घर 1926 मध्ये बांधण्यात आले होते. या घराचे नूतनीकरण करण्यासाठी 4 वर्षे लागली आहेत.