'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ लग्नबंधनात अडकला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. सचिन श्रॉफचं धुमधडाक्यात लग्न झालं आहे. सचिन श्रॉफने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सचिन श्रॉफच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. सचिन श्रॉफ सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन श्रॉफचं याआधी अभिनेत्री जूही परमारसोबत लग्न झालं होतं. सचिन श्रॉफच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सचिन श्रॉफ 25 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकला आहे. सचिन श्रॉफने लग्नसोहळ्यात पिवळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.