रशियाने सुरू केलेल्या या युद्धात सामान्य नागरीक होरपळून निघत आहे.



युक्रेनमधील हजारो नागरीक बेघर झाले आहेत. जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे.



रशियाने केलेल्या हल्ल्यात पहिल्याच दिवशी युक्रेनमधील 137 जणांचा मृत्यू झाला.



युक्रेनवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.



युक्रेनमधील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर युद्धाची झळ बसत आहे.



युक्रेनची राजधानी कीववरही रशियन फौजांनी हल्ले सुरू केले आहेत.



रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार करण्यात येत आहे.



शुक्रवारी सकाळी कीवमध्ये 6 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हे हल्ले क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांकडून करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.



रशियन फौजांनी गुरुवारी चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा मिळवला आहे.



वर्ष 1986 मध्ये या अणू ऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग पसरला होता.



त्यामुळे या परिसरातील जनजीवन उद्धवस्त झाले होते. सध्या या अणू ऊर्जा प्रकल्पाची जागा अणू प्रकल्पातील टाकाऊ वस्तूंचे केंद्र आहे.



त्याशिवाय या ठिकाणी अनेक टन अणू इंधनाचा साठादेखील आहे.



चेर्नोबिल अणू प्रकल्प रशियन फौजांच्या ताब्यात गेल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.