युक्रेनमधील ताज्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांसह 182 भारतीय नागरिकांसह युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (UIA) चे एक विशेष विमान आज सकाळी 7:45 वाजता कीव येथून दिल्ली विमानतळावर उतरले.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे की, आम्ही तात्काळ शांततेचे आवाहन करतो, परिस्थिती मोठ्या संकटात बदलण्याच्या मार्गावर आहे.
ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही तर ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठी समस्या उद्धभवू शकते. सर्व पक्षांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे.
युक्रेन-रशियामध्ये तणाव सुरु आहे. दरम्यान भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत.
यापैकी बहुतेक लोक युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्र शिकणारे विद्यार्थी आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत,
त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत.
युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहेत.
युक्रेनमधील ताज्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांसह 182 भारतीय नागरिकांसह युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (UIA) चे एक विशेष विमान आज सकाळी 7:45 वाजता कीव येथून दिल्ली विमानतळावर उतरले.