नवाब मलिकांना आज ईडीने अटक केली. मनी लॉंड्रिंग प्रकरणी त्यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित जमिनींचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी एनसीबीच्या समीर वानखेडेंविरोधात मोर्चा उघडला होता. त्यांना आता 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. हा महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जातोय. त्यांच्या अटकेच्या निषेधार्त राज्याचे मंत्री उद्या आंदोलन करणार आहेत.