बॉलिवूडमधील लाडका मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. रितेश नेहमीच विनोदी व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सोशल मीडियावर रितेश नेहमीच वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर करत असतो. रितेश देशमुख आता एमएक्स टकाटकवर बॉलिवूड स्टाईल एन्ट्री करणार आहे. रितेश आणि जेनेलियाच्या 'मिस्टर मम्मी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मिस्टर मम्मी' सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून ते चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. रितेश-जिनेलियाची लवस्टोरीदेखील खास आहे.