रुपालीचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष! सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री रुपाली भोसलेचाही समावेश आहे. ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात अनेक कलाकार आले यातलंच एक नाव म्हणजे, अभिनेत्री रुपाली भोसले. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे रुपालीनं साकारलेली संजना घराघरात पोहचली, तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे रुपालीनं नुकतंच तिचं खास फोटोशूट केलं असून तिच्या नव्या फोटोशूटमधील फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.