20 डिसेंबर रोजी सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर पाच वर्षांचा झाला आहे. तैमूरची लोकप्रियता एखाद्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. पॅपराजीकडून तैमूरचा पाठलाग होत असतो. तैमूरच्या एका फोटोसाठी त्यांच्याकडून धडपड सुरू असते. करीना-सैफ यांचा मुलगा म्हणून तैमूर पॅपाराजीच्या नजरेत आला होता. त्यामुळे करीना आणि सैफ यांना तैमूरसोबत वावरताना काळजी घ्यावी लागत होती. चिमुकल्या तैमूरलाही पॅपराजींच्या कॅमेऱ्याची सवय झाली आहे. त्यामुळे फोटोग्राफरसमोर तो बिंधास्त पोज देत फोटो काढतो. तैमूरच्या जन्मानंतर अभिनेत्री करीना कपूरचे आयुष्यही बदलून गेले.