रुची सवर्ण आणि अंकित मोहनवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



नुकतेच त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झालं आहे.



छोट्या पडद्यावरील हे कलाकार आज एका बाळाचे पालक झाले आहेत.



'नागिन 3', 'महाभारत' अशा दर्जेदार शोमध्ये काम केलेल्या अंकितने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.



आपल्या बाळाला शुभेच्छा आणि प्रेम दिल्याबद्दल अंकितने चाहत्यांचे आभार मानले आहेत.



अंकितने लिहिले आहे,आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या सर्वांचे प्रेम मिळण्यासाठी कुटुंबात आता आणखी एका सदस्याची भर झाली आहे.



लग्नाच्या सहा वर्षानंतर अंकित आणि रुचीने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.