'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच रसिका सुनील. रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या बीचवर त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. रसिकाच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात रसिका आणि आदित्य हनीमूनसाठी मालदीवला गेले होते, तिथले काही फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. रसिकाने मालदीवमध्ये बरेच फोटो काढले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (photo: rasika123s/ig)