यामुळे शरीरात गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते. याचे इतर अनेक फायदे आहेत, हे कोणते ते वाचा सविस्तर.
आयुर्वेद आणि योग या दोन्ही शास्त्रात हाताचे तळवे घासण्याचे खूप महत्त्व आहे. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी ना जास्त वेळ लागतो ना मेहनत
तळहात एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरणही वाढते. हातांचे तळवे घासल्याने अॅक्युप्रेशर पॉईंटवर दाब वाढतो आणि यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते.
हाताचे तळवे एकमेकांवर घासल्यामुळे शरीरात उष्णता तयार होते. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या कामामध्येही चपळता येते.
हाताचे तळवे एकमेकांवर चोळल्यानंतर तुम्ही ते डोळ्यांवर ठेवल्यावर तळहाताच्या उबदारपणामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. तसेच डोळ्यांभोवती रक्ताभिसरण होते. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो.
सुरुवातीला मंद गतीने तळहात एकमेकांवर घासणे सुरु करा आणि नंतर हळूहळू वेग वाढवा. तळहातामध्ये ऊर्जा तयार होईल.