चीन, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.



अशातच आता कोरोना विषाणू संदर्भात आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.



कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यानंतर या विषाणूमुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी नव्या रिपोर्टच्या आधारे हा दावा केला आहे.



शास्त्रज्ञांनी नव्या अहवालानुसार दावा केला आहे की, कोरोना महामारीदरम्यान अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यामध्ये कोरोनाला संसर्गावर मात केल्यानंतर काही दिवसांनी लोकांचा मृत्यू झाला.



कोरोनातून बरे झाल्यानंतरही कोरोनाचा धोका कमी होत नाही.



अहवालानुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यांपर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.



युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी नवीन अहवाल प्रकाशित झाला आहे.



या संशोधनानुसार, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांची अधिक लक्षणे आढळून आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.



या संशोधनामध्ये 1,60,000 लोकांवर संशोधन करून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.



चीनच्या हाँग विद्यापीठाचे प्रोफेसर इयान सीके वोंग यांनी सांगितले की, 'कोविड रुग्ण बरे झाल्यानंतर किमान एक वर्ष त्यांचे निरीक्षण करणे गेले पाहिजे.'