रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केलीय.



फाफ डू प्लेसिसची आरसीबीच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.



आयपीएलच्या पंधराव्या हंगामात फॅफ डू प्लेसिस आरसीबीच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.



आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीनं फॅफ डू प्लेसिसला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.



ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक यांच्या नावाचाही आरबीसीच्या नव्या कर्णधारपदासाठी विचार केला जात होता.



फाफ डू प्लेसिससमोर जेतेपद पटकावण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.



आरसीबीनं तीनदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. परंतु, त्यांना एकदाही आयपीएलचं विजेतेपद जिंकता आलं नाही.



फाफ डु प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे.