मँचेस्टर युनायटेडनप्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅमविरुद्ध सामन्यात पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इतिहास रचलाय.



या सामन्यात हॅट्रिक गोल करून ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनलाय.



रोनाल्डोच्या खात्यावर तब्बल 807 गोल जमा आहेत.



या कामगिरीसह त्यानं महान फुटबॉलपटू जोसेफ बिकान यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडीत काढलाय.



ख्रिस्तियानो रोनाल्डोनं साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडनं प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात टॉटनहॅमवर 3-2 अशी सरशी साधली आहे.



पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोनं विक्रमी 115 गोल मारले आहेत. तसेच त्यानं स्पोर्टिग संघाकडून पाच, रेयाल माद्रिदकडून 450, युव्हेंटसकडून 101 आणि मँचेस्टर युनायटेडकडून आतापर्यंत 136 गोल केले आहेत.



रोनाल्डोची क्लब कारकिर्दीतील ही 49वी हॅट्रिक होती.



प्रीमियर लीगच्या इतिहासात हॅट्रिक करणारा रोनाल्डो हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलाय.



रोनाल्डोनं गेल्या वर्षी जानेवारीत पेलेंचा विक्रम मोडित काढला होता. त्यावेळी पेलेंच्या अधिकृत खात्यावर 757 गोलची नोंद होती