शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर 19 फेब्रुवारी 2022 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या त्यांनी एक फोटोशूटदेखील केलं आहे. शिबानीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे हे रोमँटिक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. रोमँटिक फोटोंसोबत शिबानीने तिचे काही बोल्ड फोटोदेखील शेअर केले आहेत. मिसेस अख्तरचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लग्नानंतर शिबानीने सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. शिबानी दांडेकर-अख्तर असं नाव शिबानीने ठेवलं आहे. शिबानी आणि फरहान दोघेही पहिल्यांदाच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत कपल म्हणून दिसले होते.