खासदार संभाजीराजे छत्रपती हे कालपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने कार्यकर्तेदेखील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे. भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.