देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 10 हजार 273 नवीन रुग्ण आढळले असून 243 लोकांचा मृत्यू झाला आहे काल 11 हजार 499 कोरोना रुग्ण आढळले होते म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण कमी झाले आहेत सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 472 इतकी कमी झाली आहे कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 13 हजार 724 झाली आहे आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 90 हजार 921 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले आहेत