या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे.
ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली.
त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत.
ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
गाडी चालवताना झोप आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.