फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. अर्जेंटिना आणि फ्रान्समधील हा सामना फारच रोमांचक ठरला.
या सामन्यामध्ये अर्जेंटिना संघाचा कर्णधार आणि स्टार फूटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ खूप उत्साहात खेळताना पाहायला मिळाला.
अर्जेंटिनाच्या या विजयामध्ये खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे आणखी एक कारण आहे. एक ड्रिंक अर्जेंटिना संघाच्या चांगल्या कामगिरीचे कारण असल्याचे मानले जात आहे.
हे पेय स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील प्रत्येक खेळाडूची आवडती ड्रिंक आहे.
ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी एवढी खास आहे की, या ड्रिंकचा 5 क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ कतारला पोहोचला.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की मेस्सीच्या हातामध्ये एक ड्रिंक आहे. ही ड्रिंक खूप खास आहे.
या खास पेयाचं नाव आहे येरबा माटे. येरबा माटे (Yerba Mate) एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे.
येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल.
एका पारंपारिक पद्धतीच्या भांड्यामध्ये हे येरबा माटे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक स्ट्रॉ असते. यरबा माटे नावाच्या वनस्पतीची पाने पाण्यामध्ये उकळवून हे पेय तयार केलं जातं.
लौकी नावाच्या भांड्यामध्ये हे ड्रिंक उकळवतात, त्यामध्ये एक जाळीदार स्ट्रॉ असते. त्यामुळे स्ट्रॉमधून पानं गाळून तुम्हाला हे ड्रिंक प्यायला मिळतं.