फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवत विश्वचषक जिंकला. ज्यामुळे स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. ज्यामुळे विजयानंतर झोपताना देखील मेस्सीने ट्रॉफी सोडली नसून ट्रॉफी कुशीत घेऊनच तो झोपला. मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेस्सीनं शुभ दिवस लिहिलं असून सोबत ट्रॉफी बरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर जगभरातील मेस्सी चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मेस्सीने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. फायनलमध्येही पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकूण 3 गोल मेस्सीने केले. अर्जेंटिनाच्या सर्वच खेळाडूंना उत्तम कामगिरी केली. मेस्सीच्या या विजयाची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे.