सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच देखणी दिसत आहे निळ्या रंगाच्या साडीतले फोटोही तिनं शेअर केलेत रिंकूचे सोशल मीडियावरील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. रिंकूने तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. वर्क- आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ रिंकू शेअर करत असते.