'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतेय. मीनाक्षी मूळची जालन्याची रहिवासी आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासून झाली. वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. बहुचर्चित 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या प्रसिद्ध नाटकात तिनं महत्वाची भूमिका केली आहे. मीनाक्षीनं काही सिनेमांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.