अभिनेत्री विद्या बालनचा आज 43वा वाढदिवस आहे विद्या बालनने तिच्या अभिनयाचे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी जन्मलेल्या मुंबईत झाला विद्याला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते यासाठी विद्याला मोठा संघर्ष करावा लागला मात्र 'परिणिता' चित्रपटानंतर तिचा संघर्ष संपला लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारी ही अभिनेत्री खूप सुंदर आयुष्य जगत आहे विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले यानंतर तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले विद्याला 'परिणिता' चित्रपटासाठी 60 हून अधिक स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या