सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रेक्षकांशी कनेक्टेड राहते. नुकतेच तिने काही आऊटिंगचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकू राजगुरू निसर्गाच्या सानिध्यात रमलेली दिसत आहे. या फोटोत तिने चाहत्यांना देखील निसर्गाची सफर घडवली आहे. ‘सैराट’, ‘कागर’ असा चित्रपटांमधून रिंकूने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सैराट'नंतर रिंकूमध्येही बरेच बदल झाले आहेत. सैराटच्या वेळी सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. रिंकूने ‘आर्ची’ बनून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. ‘सैराट’ चित्रपटाने रिंकू राजगुरूचं आयुष्य रातोरात बदलून टाकलं.