बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.



आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकरी करत आहेत.



बॉयकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शवर झाला.



आमिर आणि अभिनेत्री करीना कपूरच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा निर्णय काही नेटकऱ्यांनी घेतला होता.



आमिरचे काही चाहते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची वाट बघत होते. पण आता त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर बघता येईल की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळत नाहीये.



प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं देखील हा चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला आहे.



सध्या प्रेक्षक थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात.



सध्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षयच्या रक्षा बंधन या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसताना दिसत आहे.



बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या लाल सिंह चड्ढाला आता ओटीटी रिलीजसाठी एकही खरेदीदार मिळत नाहीये.