अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा खूप स्टायलिश आहे. शिवाय दिसायलाही ती खूप सुंदर आहे.

परंतु, रिद्धिमा एकाही चित्रपटामध्ये दिसली नाही.

रिद्धिमाने बॉलिवूडमध्ये कधीही रस दाखवला नाही.

शिवाय ती प्रसिद्धीपासून कायमच दूर राहिली.

एका मुलाखतीत स्वत: रिद्धिमानेच याचे कारण सांगितले होते.

चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक ऑफर्स आल्या. परंतु, मी त्या कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत.

आई नीतू कपूर यांनाही मी याबाबत सांगितले होते. परंतु, इतक्या लहान वयात चित्रपटात पदार्पण करू नये असे आईला वाटत होते.

रिद्धिमा सांगते, लंडनमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले. भारतात परत येताच माझे लग्न झाले.