बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी आजचा दिवस खास आहे.
आज आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले आहेत.
लग्नानंतर आलिया-रणबीरचे फोटो समोर आले आहेत.
मुंबईतल्या वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा पार पडला.
आलियाच्या विवाहाला कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती.
लग्नानंतर आलिया-रणबीरने एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे.
पंजाबी रितीरिवाजांनुसार आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले.
लग्नानंतर लगेचच दोघेही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
आलियाने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.