बॉलीवूड इंडस्ट्रीत कमी वेळात ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री ऋचा चढ्ढा तिच्या अभिनयाने ओळखली जाते. देशाच्या कोणत्याही मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यात रिचा चढ्ढा मागे नसते. इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत रिचा चढ्ढाचे नाव आहे. रिचाने नुकतेच आपले काही फोटो शेअर केले आहेत. रिचाने डीप नेक पिंक कलरचा शिमरी शॉर्ट ड्रेस घातला आहे या ड्रेसमध्ये रिचा खूप बोल्ड आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. रिचा चढ्ढाच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्या गाण्याची ओळही लिहिली. चाहत्यांकडून रिचाचे फोटो शेअर करण्यात येत आहेत. रिचाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.