बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मानुषी छिल्लरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही आता अभिनेत्रीच्या हातात आणखी एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. होय, मानुषी तिच्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे 'तेहरान' या चित्रपटात ती जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढेच नाही तर मानुषीने जॉनसोबत चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरून मानुषीची छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती शूटिंगच्या ठिकाणी जॉन अब्राहमसोबत दिसत आहे. यासोबतच या चित्रपटातील मानुषीचा लूकही समोर आला आहे 'तेहरान'चे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे. दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटानंतर मानुषी अभिनेता विकी कौशलसोबत 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये दिसणार आहे (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)