18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत. धनुषचा नुकताच 'अतरंगी रे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात धनुषने महत्त्वाची भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून ती चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका देखील आहे. अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त